September 23, 2023
PC News24
गुन्हा

पुणे: मोटर परिवहन विभागातील (पुणे) पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या.

पुणे: मोटर परिवहन विभागातील (पुणे) पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पुणे शहर पोलीस दलातील एम.टी. मोटार परिवहन विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्याने राहत्या घरी गच्चीवर गळफास घेत आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव दिलीप शिंदे हे मोटर परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत होते. ते लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनी येथे पत्नी कांचन आणि चार वर्षाचा मुलगा यांच्या सोबत राहत होते.आज पहाटेच्या सुमारास वैभव यांनी घराच्या टेरेसवर असलेल्या झाडाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना वैभव शिंदे यांची पत्नी कांचन यांनी पाहिल्यानंतर, वैभव यांना जवळील रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आत्महत्या प्रकरणी कुटुंबीयांकडे चौकशी केली असता वैभव शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहुन ठेवली होती. त्यामध्ये ”कांचन मला माफ कर, भाऊ, मम्मी मला माफ करा, विजय माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, कांचनसोबत लग्न कर. सॉरी!” असा मजकूर त्यामध्ये लिहिला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.

Related posts

पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यां विरोधात तक्रार,पुरुष आणि महिला कर्मचारी यांची दादागिरी.

pcnews24

संभाजीनगर,चिंचवड:बालविवाह प्रकरणी मुलीच्या पालकांवर गुन्हा

pcnews24

पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

pcnews24

जुनी भांडणे सोडवल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; तिघांना अटक

pcnews24

मावळात मोठा राजकीय खूनाचा कट-किशोर आवारे खूनाचा बदला.

pcnews24

एकतर्फी प्रेमाच्या त्रासाने १५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.

pcnews24

Leave a Comment