मावळ:२२ वर्षीय पत्नीची गळफास घेत आत्महत्या…पतीचे विवाहबाह्य संबंध व शारीरिक व मानसिक त्रासाचे कारण
मावळ तालुक्यातील वराळे या गावात विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे.ही घटना सोमवारी घडली.पतीचे विवाहबाह्य संबंध तसेच त्याच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक त्रास होत होता. राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे.
याप्रकरणी मयत मुलीच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती निर्गुण भोलानाथ तिकडे (वय 26 राहणार वराळे , मावळ) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 22 वर्षीय मुलीचा आरोपी सोबत लग्न झाले. मात्र मागील तीन महिन्यापासून आरोपी हा मयत मुलीला त्रास देत होता. त्याचे विवाहबाह्य प्रेम संबंध होते याबरोबरच तो मुलीला माहेरून पैसा घेऊन ये असा तगादा लावून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता.अखेर त्याच्या या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.