September 23, 2023
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

निगडी:मॉर्डन प्री -प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमधे साजरी झाली भारतीय संस्कृती व परंपरेचे महत्व सांगणारी गुरुपौर्णिमा.

निगडी:मॉर्डन प्री -प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमधे साजरी झाली भारतीय संस्कृती व परंपरेचे महत्व सांगणारी गुरुपौर्णिमा

 

निगडी यमुनानगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन प्री -प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बुधवारी (दि.5) गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. आपल्या संस्कृतीचे व परंपरेचे महत्व सांगणारी संकल्पना शाळेचे चेअरमन प्रो. शामकांत देशमुख व यशवंत कुलकर्णी यांनी सुचविली.या कार्यक्रमाची सुरुवात व्यासांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली . प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु ही त्याची आई असते. ती त्याची दैवतही असते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्युनिअर के.जी. व सिनीअर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई आणि वडिलांची पाय धुऊन त्यांना नारळ आणि फूल देऊन त्यांना वंदन केले

शाळेचे व्हिजिटर डॉ. प्रो. अतुल फाटक व मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व सहकार्यवाह ज्योस्त्ना एकबोटे यांनी मुलांचे कौतुक केले.शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे ह्यांनी या कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले.

Related posts

पोलिसांचे विशेष बाल पथक करते आहे समुपदेशन,चुकीच्या मार्गाला मिळणार योग्य ‘वळण’.

pcnews24

महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा,गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न.आयुक्त शेखर सिंह यांची माहिती,शिक्षण विभागावर ‘कोअर कमिटी’!.

pcnews24

संस्था चालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण विषयावर गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन

pcnews24

सरकारी शाळा ‘कार्पोरेट’ला दत्तक नको- सामान्य नागरिकाचे निवेदन,गरीब,बहुजन समाजातील मुले मोफत हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती ?

pcnews24

विद्यार्थ्याचे यश शिक्षकांच्या शिकविण्यावर अवलंबून – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे आयोजन.

pcnews24

दहावीचा निकाल पाहण्यासाठी हे करा दहावी परीक्षेचा निकाल आज (2 जून) जाहीर होणार आहे.

pcnews24

Leave a Comment