September 23, 2023
PC News24
राजकारण

पिंपरी विधानसभेत भाजपाची चिंतन बैठक, मतदारसंघात भाजपच क्रमांक एकचा पक्ष.

पिंपरी विधानसभेत भाजपाची चिंतन बैठक, मतदारसंघात भाजपच क्रमांक एकचा पक्ष

राज्यात झालेल्या राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर भाजपा पिंपरी विधानसभा सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची चिंतन बैठक शहर कार्यालयात पार पडली. बदलल्या राजकीय समीकरणाचा भाजप संघटनेवर काय परिणाम होत आहे, कार्यकर्त्यांचा काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख अमित गोरखे व विधानसभा प्रमुख कार्यकर्त यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पिंपरीत भाजपा कार्यकर्ता संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व पुन्हा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित येऊन काम करणार आहोत. भाजपा कार्यकर्ते यांच्या भावनांची नोंद घेऊन आपल्या समस्या वरिष्ठ नेते यांच्या पर्यंत पोहचवल्या जातील असे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी सांगितले.

राजकीय समीकरण जरी बदलले असले तरी भाजपा पक्ष हा अधिक सक्षमपणे पुढील वाटचाल करेल, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी झालेला बदल स्विकारून आपल्या पक्ष संघटनेस अधिक मजबूत केले पाहिजे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा हाच एक क्रमांक चा पक्ष असेल हा निर्धार करून आपण सर्वांनी अधिक जोमाने कामाला लागले पाहिजे. भोसरी विधानसभा अथवा शिरूर लोकसभेची जरी जबाबदारी माझ्यावर असली तरी पिंपरी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत अशी ग्वाही शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली.

Related posts

NCP प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED चे समन्स.

pcnews24

सूरत कोर्टाने राहुल गांधीना दिलेल्या शिक्षेवर स्थगिती.

pcnews24

समाज कल्याण विभागाकडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू.-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

pcnews24

राहुल गांधींची संरक्षण समितीवर नियुक्ती.

pcnews24

बेरोजगारी, दुष्काळ या विषयावर विशेष अधिवेशन का बोलवले नाही – आ. रोहित पवार यांनी उपस्थित केला प्रश्न भाजपात गेलेल्यांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागेल – आ. रोहित पवार

pcnews24

महाराष्ट्र:अजित पवार यांचे अत्यंत प्रभावी, आक्रमक आणि भावनिक आवाहन.

pcnews24

Leave a Comment