पिंपरी चिंचवड:संघटित गुन्हेगारी करणाऱ्या करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
संघटितपणे गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई करून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड व परिसरातील गुन्हेगारांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
जानेवारी ते जुलै या कालावधीत तब्बल 14 टोळ्यातील 168 आरोपींवर अशी कारवाई करण्यात आली आहे त्यातील करण रोकडे, बाबा सैफन शेख आणि अनिल जगन जाधव या प्रमुख टोळ्या आहेत.चिखली येथील टोळी प्रमुख करण रोकडे (वय 25, रा. चिंतामणीनगर, चिखली) आणि त्याच्या 12 साथीदारांच्या विरोधात मोकाची कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील आरोपींच्या विरोधात खून, खुनाचा कट रचणे, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून खूनाचा प्रयत्न, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी, बेकायदेशीरपणे अग्निशम जवळ बाळगणे, असे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. वर्चस्ववादातून त्यांनी सोन्या तापकीर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. टोळी प्रमुख करण रोकडे, सौरभ उर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे (वय 23, रा. मोईगाव, ता. खेड), चेतन राजू कणसे (वय 27, रा. चिखली), सचिन दीपक लोखंडे (वय 27, रा. चिखली), सचिन नितीन गायकवाड (वय 23, रा. चिखली गावठाण), मुंग्या उर्फ हृतिक रतन रोकडे (रा. चिखली), रिंकू दिनेश कुमार (वय 18, रा. चिखली), प्रीतम प्रताप सोनोने (वय 31, रा. चिखली), ऋतिक सुभाष जाधव (वय 24, रा. देहूगाव), कपिल लोखंडे, एक महिला आणि दोन अल्पवयीन मुले यांच्यावर कारवाई झाली आहे.
सांगवीतील टोळी प्रमुख बाबा सैफन शेख,(वय 29, राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव) त्याच्या टोळीतील इतर आठ जणांच्या विरोधात मोकाची कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर जबर दुखापत करून दरोडा, गंभीर दुखापत, दुखापत, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवुन गंभीर दुखापत, गाडयांची तोडफोड करुन नुकसान करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे असे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये टोळी प्रमुख बाबा शेखसह साथीदार रामा हनुमंत कांबळे (वय 25 , रा. बाणेर), अक्षय मारुती अहिवळे (वय 21, रा. औंध), गफूर हुसेन शेख (वय 21, रा. औंध), अनिल सिद्धू आणुरकर (वय 19, रा. बाणेर), आकाश संजय क्षीरसागर (वय 20, रा. पिंपळे गुरव) या टोळीवर कारवाई झाली आहे.