September 23, 2023
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिका

महापालिका राबविणार महिलांसाठी ‘ या ‘ योजना..31 ऑगस्टपर्यंत अर्ज मुदत

महापालिका राबविणार महिलांसाठी ‘ या ‘ योजना..31 ऑगस्टपर्यंत अर्ज मुदत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना राबविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मर्यादित कालावधीकरीता असणाऱ्या योजनेमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थीनींना सायकल घेण्यासाठी 7 हजार रुपये अर्थसहाय्य, सामाजिक संस्थांना सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी 25 हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.

लोकनायक गोपीनाथ मुंडे योजनेत 12 वी नंतरचे प्रथम वर्ष वैद्यकीय योजनेंतर्गत (एम .बी. बी. एस/ बी. ए. एम. एस / बी. एच. एम. एस / बी. डी. एस / बी. यु. एम. एस)बी.आर्किटेक्चर / बी. पी. टी. एच / बी. फार्म / बी. व्ही. एस. सी आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी 25 हजार रुपये आणि रामभाऊ म्हाळगी योजनेंतर्गत मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमा साठी आय. टी. आय विद्यार्थ्यांना 3 हजार रुपये आणि अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांना 7हजार 500 रुपये देण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य मंडळ (एस.एस.सी बोर्ड ) अंतर्गत शाळांमधील इयत्ता 10 वी च्या मुलींना शैक्षणिक साहित्यासाठी 6 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

वर्षभर खुल्या असणाऱ्या योजना..स्व.प्रमोद महाजन योजनेंतर्गत परदेशातील उच्चशिक्षण / अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतीस प्रथम वर्षासाठी 1 लाख 50 हजार रुपये आणि अटलबिहारी वाजपेयी योजनेंतर्गत विधवा / घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजनेतर्गत प्रशिक्षण घेतले असल्यास 25 हजार रुपये किंवा प्रशिक्षण घेतले नसल्यास 15 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेंतर्गत पहिल्या मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस 25 हजार रुपये मुदत ठेव स्वरूपात देण्यात येईल.मदर तेरेसा योजनेंतर्गत नोंदणीकृत महिला संस्थांना / महापालिकेकडील नोंदणीकृत अनुदान प्राप्त महिला बचतगटांना पाळणाघर सुरू करण्याकरिता प्रारंभिक मुलभूत खर्चासाठी 10 हजार रुपये आणि त्यानंतर इतर खर्चासाठी दर सहामाहीस 12 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना 25 हजार रुपये तर महर्षी धोंडो केशव कर्वे योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या मुलींना संसार उपयोगी साहित्य घेणेसाठी 25 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याच योजनेअंतर्गत विधवा महिलांकरिता पुनर्विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

6 महिने पुर्ण झालेल्या महिला बचतगटास तसेच 2 वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचतगटास 15 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या सर्व योजनांचे अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून मुखपृष्ठावरील समाज विकास विभाग योजना या पर्यायावरून दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.

Related posts

पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम तीन महिन्यात सुरू होणार?

pcnews24

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून विसर्जन घाटांची पाहणी

pcnews24

महापालिकेचे पर्यावरणपूरक ई-रिक्षांच्या वापराचे ‘लक्ष्य ‘

pcnews24

एमआयडीसी भोसरी डीपी रोडवरील बाधित व्यावसायीकांना चऱ्होली गावात जागा

pcnews24

महानगरपालिकेच्या मालमत्ता बिलातील उपयोगकर्ता शुल्क वसुलीस अखेर स्थगिती-आमदार महेश लांडगे यांनी मांडली प्रखर भूमिका.

pcnews24

अतिक्रमण हटवण्याचे काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण

pcnews24

Leave a Comment