September 23, 2023
PC News24
तंत्रज्ञान

थ्रेड्सने विणले ट्वीटरभोवती टेन्शनचे धागे,थ्रेड्स अ‍ॅपने रचला नवा इतिहास

थ्रेड्सने विणले ट्वीटरभोवती टेन्शनचे धागे,थ्रेड्स अ‍ॅपने रचला नवा इतिहास

काही मिनिटांत लाखोंच्या सर्वाधिक डाऊनलोड होणारे Threads अ‍ॅपने सारे रेकॉर्ड्स तोडले.ही वाढती क्रेझ पाहून आता ट्वीटरचं टेन्शन वाढलं आहे.ट्वीटरशी स्पर्धा करण्यासाठी लाँच करण्यात आलेले थ्रेड्स अ‍ॅप काही मिनिटांत लाखो डाऊनलोड असलेले अ‍ॅप बनले आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात इतकी लोकप्रियता मिळाल्याने थ्रेड्स अ‍ॅपने नवा इतिहास रचला आहे.

मेटाच्या मालकीच्या इन्स्टाग्रामनेच थ्रेड्स हे नवे अ‍ॅप आता रिलीज केले असून ट्वीटरला स्पर्धा देण्यासाठी हे अ‍ॅप आले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपने काही तासांतच तुफान डाऊनलोड्स मिळवत सर्वकालीन उच्च डाउनलोड प्राप्त केले आहेत. अशा प्रकारे थ्रेड अ‍ॅप्सने एक नवा इतिहास रचला आहे.

थ्रेड्स अ‍ॅपमुळे मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्वीटरचे टेन्शन सर्वाधिक वाढले आहे. कारण थ्रेड्स अ‍ॅपला ट्वीटरच्या स्पर्धेतच उतरवण्यात आले आहे. ट्वीटर गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळे बदल करत आहे. एलन मस्कने ट्वीटर विकत घेतल्यावर रोज नवनवीन नियम लागू केले आहेत. यासोबतच ट्वीटरसाठी ब्लू सबस्क्रिप्शन लागू करण्यात आले आहे, ज्यासाठी यूजर्सना दरमहा ६५० ते ८०० रुपये मोजावे लागत होते. त्यामुळेच मेटाने थ्रेड्स अ‍ॅप लाँच केल्याने, ट्वीटरला पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे ट्वीटरला पर्याय शोधणाऱ्यांचा एक मोठा ट्वीटर वापरकर्तावर्ग थ्रेड्सकडे स्थलांतरित झाला आहे.थ्रेड अ‍ॅप सर्वात वेगाने डाऊनलोड होणारे अ‍ॅप बनले आहे. थ्रेड अ‍ॅप आतापर्यंत ५० दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. हे अ‍ॅप लाँच झाल्यानंतर काही तासांतच एक कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे.

१ कोटी वापरकर्त्यां पर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या अ‍ॅपला किती वेळ लागला?

थ्रेड अ‍ॅप – ७ तास

ट्विटर – २ वर्षे

फेसबुक – १० महिने

इंस्टाग्राम – २.५ महिने

WhatsApp – १ वर्ष

ChatGPT – ५ दिवस

Netflix – ३.५ वर्षे

Spotify – ५ महिने

थ्रेड अ‍ॅप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजेच ते अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. याशिवाय, वापरकर्ते डेस्कटॉपवर साइटवरून थ्रेड वापरण्यास सक्षम असतील.

Related posts

ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन- चांद्रयान लाँचिंग काउंटडाउन देणारा आवाज हरपला.

pcnews24

मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आराखडा; औद्योगिक वसाहत आणि ग्रामीण भागात देखील विस्तार.

pcnews24

आंतरराष्ट्रीय: ‘थ्रेड्स’ लॉन्च होताच 24 तासांत 5 मिलियन युजर्स

pcnews24

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारणार ई महामार्ग.

pcnews24

मोबाईल हरवला किंवा चोरी झाल्यास आता काळजी नाही, शासनाने केली यासंबंधीची पोर्टल निर्मिती.

pcnews24

विद्युत सुरक्षा पाळा आणि जिवीत हानी टाळा: महानगरपालिका

pcnews24

Leave a Comment