अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांत बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवडचा वीजपुरवठा खंडित.. भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून
शनिवारी (दि. 8 ) सकाळी 9 च्या सुमारास
शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब वीज वाहिनी तुटल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील वीजपुरवठा बंद झाला होता.
तळेगाव एमआयडीसी जवळ आज सकाळी 9 वाजता पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव 400 केव्हीच्या अतिउच्चदाब चारपैकी एक वीजवाहिनी तुटली. त्यामुळे सुमारे 355 मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले.
पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ आदी परिसरातील वीजपुरवठा बंद पडला.
पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान महापारेषण व महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.