TATA स्ट्रायडरची नवी इलेक्ट्रिक सायकल जिटा प्लस लॉन्च, 1Km चा खर्च केवळ 10 पैसे
टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची कंपनी असलेल्या स्ट्रायडरने जिटा रेंजची नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. जिटा प्लस असे या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे. पर्यावरण पूरक अश्या ह्या सायकल लॉन्च इव्हेटवेळी स्ट्राइडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता म्हणाले, स्ट्राइडर जीटा प्लस 26,995 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आली आहे. मात्र, ही किंमत लिमिटेड कालावधीसाठीच असेल. यानंतर, हिची किंमत 6000 रुपयांनी वाढविण्यात येईल.
या सायकल ची वैशिष्ट्ये
– दमदार बॅटरी, देऊ शकते 30 किलोमीटरपर्यंत रेंज
– ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क
– 1Km चा खर्च केवळ 10 पैसे
झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलसोबत उच्च दर्जाची, म्हणजेच 36-volt/6 Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल जवळपास 30 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते आणि पॅडल न मारता जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रतितास वेगाने चालू शकते. महत्वाचे म्हणजे, केवळ तीन ते चार तासांतच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होते, असे कंपनीने म्हटले आहे.
या सायकलला ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच सायकलच्या हँडल बारवर SOC डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.परंतु बॅटरीची रेन्ज आणि वेळ यासंदर्भात माहिती देण्यात आली नाही. ही सायकल कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर धावू शकते,असे कंपनीने सांगितले आहे.केवळ 10 पैसे प्रति किलोमीटर एवढाच खर्च या सायकलला येतो. अर्थात यामुळे लोकांची मोठी सेव्हिंग होईल. या ब्रँडचे प्रॉडक्ट देशभरात 4,000 हून अधिक रिटेल स्टोर्सवर विकले जातात.