September 23, 2023
PC News24
गुन्हा

दामिनी पथक सक्षम करण्यास आवश्यक ते सहकार्य – चंद्रकांत पाटील

दामिनी पथक सक्षम करण्यास आवश्यक ते सहकार्य – चंद्रकांत पाटील

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी जिल्हा नियोजन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 5 स्कॉर्पिओ आणि 12 बोलेरो वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला.पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, दिलीप मोहिते, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे मॅडम, पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन काकासाहेब डोळे आदी उपस्थित होते.महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत दामिनी पथकांची संख्या वाढवावी. त्यासाठी वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी केले.

नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयातील बरासचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून गस्त घालण्यासाठी वाहनांची मदत होईल. पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिशा उपक्रमात सहभागी ७ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिक कक्षाद्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.
पिंपरी चिंचवड पोलिसआयुक्तालया मधील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

Related posts

दिघी :महिलेच्या पर्समधून पीएमपी बस प्रवासात 59 हजाराची रोकड लंपास

pcnews24

महसूल गुप्तचर संचालनालयाला तस्करी मोहीमे अंतर्गत मोठं यश,15 कोटींचे कोकेन साठा जप्त 

pcnews24

विवाहितेला 150 उठाबशा काढण्याची अजब शिक्षा.

pcnews24

महाराष्ट्रात दिवसाढवळ्या बंदूकईच्याजोरावर लूट (बघा व्हिडिओ)

pcnews24

चिखलीतील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईनच्या नादात 13 लाखांची फसवणूक

pcnews24

तळेगाव एमआयडीसी परिसरातून (मावळ) जिवंत काडतुस व पिस्टलसह तरुणाला अटक

pcnews24

Leave a Comment