पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची आयुक्तांकडे केली मागणी..
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार काम करतात,या कामगारांना संबंधित ठेकेदार पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे पालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आदेश द्यावेत अशी मागणी भाजपा कामगार सेलचे सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी केली आहे.
आयुक्त सिंह यांना लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी महापालिकेमधून दर महिन्याला 30 ते 35 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळे महापालिकेत विविध विभागात ठेकेदारामार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.परंतु संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही.
त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सरचिटणीस लांडगे यांनी केली आहे.