डोमिनोज पिझ्झाचे अधिकृत स्टोअर देतो असे सांगत एक कोटी रुपयांची फसवणूक
डोमिनोज पिझ्झा या दुकानाची अधिकृत शाखा मिळवून देतो असे सांगत एका व्यावसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना ९ जून ते ६ जुलै २०२३ या कालावधीत भोसरी येथे घडली. याप्रकरणी विवेक दत्तू राठोड (वय ३५, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दीपक शर्मा, निपुण मित्तल व प्रकाश सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत.
त्यांना डोमिनोज पिझ्झा दुकानाची अधिकृत शाखा हवी होती.आरोपींनी फिर्यादी यांना शाखा देण्याचे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून १ कोटी ५१ हजार रुपये बँक खात्यावर जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर शाखा उपलब्ध करून न देता टाळाटाळ करत फिर्यादींची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.