इंडिगो हवाई कंपनीचा सुवर्ण त्रिकोण,पुण्यातील हवाई मार्गांमध्ये इंडिगोद्वारे वाढ.
महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या सुवर्ण त्रिकोणामध्ये गतिशीलता, सुलभता,तसेच आंतरराज्यीय कनेक्शन सुधारण्यासाठी इंडिगो हवाई कंपनी अतिरिक्त मार्ग सुरु करणार आहे. गुरुवारी (दि. 7) इंडिगोने पुण्याला जाण्या-येण्यासाठी जोधपूर, राजकोट आणि वडोदरा असे तीन नवीन मार्ग सुरू करण्याची घोषणा केली.इंडिगो कंपनीने 16 जूनपासून पुणे आणि जोधपूर तर 3 जुलै पासून पुणे-राजकोट आणि पुणे-वडोदरा दरम्यान ही सेवा सुरू झाली आहे.
इंडिगोचे ग्लोबल सेल्स हेड विनय मल्होत्रा यांनी माहिती दिली की, “या नवीन मार्गांमुळे फक्त आंतरराज्यीय गतिशीलता आणि कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार नाही. तर देशाच्या सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक वाढीसही हातभार लागेल.
देशांतर्गत कनेक्टिव्हिटी आम्ही वाढवत राहू. आणि आमच्या व्यापक नेटवर्कवर परवडणारा, बरोबर वेळेवर होणार, विनम्र आणि त्रास-मुक्त प्रवासाचा अनुभव प्रदान करण्यासाठी आमची वचनबद्धता कायम ठेवू.”पुण्याहून जोधपूर आणि वडोदराला जाणारी व परत येणारी विमाने बुधवार आणि शनिवार वगळता दररोज चालणार आहेत. तर पुण्याहून राजकोटला जाणारी व परतणारी विमाने शनिवार वगळता दररोज सुरू असतील.