सनदी लेखापाल म्हणजे अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण दुवा – चंद्रकांत पाटील
अर्थव्यवस्थेतील महत्वपुर्ण दुवा म्हणून सनदी लेखापाल यांना संबोधले जाते.उच्च शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना निश्चितच एखाद्या नामांकित कंपनीत किंवा संस्थेत मोठ्या हुद्द्यावर काम मिळेल तथापि त्यांनी या कामासोबतच आपला थोडा वेळ समाजसेवा करण्यासाठीही द्यावा असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने 8 व 9 जुलै रोजी लेखा आणि वित्त क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेगा परिषदेचे आयोजन महापालिकेच्या सहाय्याने निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. आजच्या शिबिरातील लेखा आणि वित्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आमदार महेश लांडगे, माजी नगरसदस्य एकनाथ पवार,शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी महापालिकेचे सह शहर अभियंता मनोज सेठिया, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष रणजित आगरवाल, सनदी लेखापाल मंगेश किनरे,पिंकी केडीया अशोककुमार पगारीया, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सचिन बंसल, पंकज पाटणी, वैभव मोदी, अक्षय बाहेती, खजिनदार शैलेश बोरे, सचिव सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष विजय बामणे, कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे विद्यार्थी कौशल्य संवर्धन मंडळाचे अध्यक्ष मंगेश किनरे, उपाध्यक्ष श्रीधर मुप्पाला, परिषद संचालक पियुष छाजेड उपस्थित होते तसेच लेखा आणि वित्त क्षेत्रातील शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक उपस्थित होते.