September 23, 2023
PC News24
सामाजिक

एमआयडीसी मधील परप्रांतीय कामगारांची आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी- अभय भोर.

एमआयडीसी मधील परप्रांतीय कामगारांची आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी- अभय भोर

भोसरी एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगारांकडून व भंगारच्या दुकानांमुळे चोऱ्यांमध्ये वाढ होत आहे. यासाठी कंपन्या आणि हॉटेल व्यवसायिकांकडे असलेल्या परप्रांतीय कामगारांची वेळोवेळी आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज भोसरी एमआयडीसी येथे आयोजित बैठकीत केली .

भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये अनेक कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर पर राज्यातील कामगार कामाला येतात. या परिसरात असलेल्या हॉटेल,टपरीवर अनेक परप्रांतीय कामाला आहे.
परंतु हे परप्रांतीय रात्रीच्या वेळेस एमआयडीसी मध्ये चोऱ्या करण्यात सुद्धा पुढाकार घेत असल्याचे दिसते .
यात तरुण समाविष्ट असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा कागदपत्रे आढळून येत नाहीत चोऱ्या करून गावाला निघून जातात आणि चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे, येथे असलेली छोटी मोठी भंगारची दुकाने देखील याला कारणीभूत आहेत .

भंगार व्यवसायिकांना चोरांमार्फत हा चोरीचा माल पुरवठा केला जातो. एमआयडीसी परिसरात पोलीस आयुक्तालयातर्फे वेळोवेळी तपासणी मोहीम हाती घेतल्यास एमआयडीसीतील या चोऱ्या थांबविता येतील.

प्रत्येक हॉटेल व्यवसायिक व्यापारी आणि कंपनीने कामाला ठेवणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्र जवळ ठेवणे गरजेचे आणि सक्तीचे करावे ,अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय दादा भोर यांनी आज केली .यावेळी यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी उद्योजकांच्या समस्यांकडे गांभीर्याने घेतले जाईल व समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1, पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर,सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन राजेंद्र निकाळजे यांच्याकडे चोऱ्या थांबविण्यासाठी उपयोजना करण्याची मागणी करण्यात आली.

Related posts

गणेशोत्सवानिमित देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर.

pcnews24

नियोजनबद्ध झाडांची कत्तल,अघोरी पद्धतीने झाडे जाळण्याचा धक्कादायक प्रकार,वनसंरक्षक कायद्याचे चिंचवड एमआयडीसी कॉलनीत उल्लंघन.

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय यांची संयुक्त गणेशोत्सव बैठक संपन्न.

pcnews24

पुण्यात विविध ब्राम्हण संघटनांतर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न

pcnews24

भोसरी भागातील लांडगे वस्तीतील दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला..भटक्या कुत्र्याची दहशत पुन्हा दहशत

pcnews24

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा “निकाल’ लांबणीवर,सुप्रीम कोर्टातील ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण.

pcnews24

Leave a Comment