कामगाराच्या सतर्कतेने बँकेतील चोरीचा प्रयत्न फसला
पिंपरी-चिंचवड : शहरातील डांगे चौक येथील फेड बँकेत चोरी करण्याचा हा प्रयत्न झाला परंतु चोरी करण्याचा मोठा डाव पोलीस आणि शेजारील कामगाराच्या सतर्कतेने फसला आहे.
आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्याला पकडण्यासाठी गेलेला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला.या प्रकरणी एकाला पोलिसांनी पकडलं आहे.