March 1, 2024
PC News24
गुन्हा

निगडी-रुपीनगर येथे गाड्यांची तोडफोड करून दहशत.. कोयत्यांचा वापर

निगडी-रुपीनगर येथे गाड्यांची तोडफोड करून दहशत.. कोयत्यांचा वापर

निगडी येथील रुपीनगर मेन रोड, जुना बस स्टॉप परिसरातील दुचाकी, चारचाकी गाड्यांची, तसेच दुकानाची सहा ते सात अज्ञात तरुणांनी तोडफोड केली. ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

गाड्यांच्या तोडफोडीचा आवाज आल्याने नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली. गाड्यांची तोडफोड कोयते, दांडके, दगड आदीच्या साहाय्याने केली आहे. यामध्ये एक दुकान व्यावसायिक कोयत्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरल्याने रुपीनगर परिसरात एकच खळबळ उडाली.

पिंपरी चिंचवड येथे देखील पुण्यासारखी कोयता गँग तयार झाली आहे का? अशी कुजबूज चालू आहे.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद
करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related posts

कंपनीमधील ॲल्युमिनियम साहित्याची चोरी …

pcnews24

वाहन चालकाकडून पैसे घेतल्याने 2 पोलीस निलंबित (व्हिडिओ सह)

pcnews24

वाकड:चार वर्षीय मुलगी गायब आणि अपहरणाचा कॉल

pcnews24

शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.

pcnews24

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणातील मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक

pcnews24

बिजली नगर चिंचवड परिसरातील हरितपटा नामशेष होण्याच्या मार्गावर,सखोल चौकशीची मागणी

pcnews24

Leave a Comment