September 26, 2023
PC News24
गुन्हा

संभाजीनगर,चिंचवड:बालविवाह प्रकरणी मुलीच्या पालकांवर गुन्हा

संभाजीनगर,चिंचवड:बालविवाह प्रकरणी मुलीच्या पालकांवर गुन्हा

मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे हे माहिती असून देखील तिचा विवाह आई व वडिलांनी लावून दिला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी तीन वाजताच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहे हे माहिती असूनदेखील तिचा विवाह तिचा किशोर पोपट क्षीरसागर (वय 27) याच्याशी लावून दिला. हा विवाह सोहळा शनिवारी दुपारी संभाजीनगर, चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करून मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा नोंदवला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
याप्रकरणी पोलीस नाईक शिवाजी नागरगोजे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीचे वडील प्रकाश तात्याबा डोके (वय 45) आणि त्याची पत्नी (दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर) आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

दिघी:साखरपुड्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार

pcnews24

पिंपरी चिंचवड मध्ये अजुन ही कोयत्याची दहशत.

pcnews24

हिंजवडी:जीवे मारण्याची धमकी देत महिलेचे फोटो व्हायरल करत बदनामी

pcnews24

पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी पुण्यातील डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना अटक

pcnews24

सुषमा अंधारे यांंना कानशिलात,उठाशि गटातील जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

pcnews24

वाघोली, पुणे:७० वर्षीय निवृत्त बँक मॅनेजर खूनाची धक्कादायक घटना.. ताम्हीणी घाटात सापडला मृतदेह

pcnews24

Leave a Comment