खेड:टँकर चालकाने केली तेलाची परस्पर विक्री-चालकासह तिघांना अटक
खेड तालुक्यातील खालुंबरे येथे शनिवारी(दि. 8) पहाटे चार वाजताच्या सुमारास तेलाच्या टँकरवर चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने परस्पर टँकर मधील तेलाची विक्री केली. याप्रकरणी टँकर चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम हा फिर्यादी यांच्या कंपनीच्या तेल वाहतूक करणाऱ्या टँकरवर चालक आहे. त्याने खोपोली येथे पामतेल भरले. तेलाने भरलेला टँकर घेऊन जात असताना खालुम्ब्रे गावात अन्य दोन आरोपींच्या मदतीने 210 लिटर सतरा हजार पाचशे रुपये किमतीचे पामतेल चोरून काढले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राम उजागीर यादव (वय 40, रा. उत्तर प्रदेश), दुर्गाराम रूपाराम परमार (वय 63, रा. निगडी), राजुराम बचनराम चौधरी (वय 42, रा. निघोजे ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी नवनीत यशवंत म्हात्रे (वय 43, रा. खोपोली रोड, खालापूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.