September 28, 2023
PC News24
गुन्हा

चिखली:मुख्याध्यापकाला जातीवाचक शिवीगाळ एकावर गुन्हा दाखल.

चिखली:मुख्याध्यापकाला जातीवाचक शिवीगाळ एकावर गुन्हा दाखल

चिखली मोरे वस्ती येथील श्री शिवछत्रपती विद्यालयात शनिवारी (दि. 8) दुपारी मुख्याध्यापकाला शिवीगाळ करू नको, असे सांगितल्याच्या कारणावरून एकाने जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली.

अविनाश वसंत पवार (वय 36, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मधुकर दशरथ काळे (रा. रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धटपणे बोलून वाद घालत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला तू मुख्याध्यापकांशी नीट बोल, असे सांगितले.

या कारणावरून संतापलेल्या आरोपीने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करीत म्हणाला की तू विनाकारण नाक खूपसू नकोस, तसा तुलाही माज आला आहे. तू बाहेर ये बघून घेतो, अशी शिवीगाळ करीत पुन्हा धमकी दिली. सहायक पोलीस आयुक्‍त कोपनर तपास करीत आहेत.

Related posts

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीची रायगड पोलिसात तक्रार.

pcnews24

कोर्टाच्या आवारात सुनेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न

pcnews24

अनधिकृत जाहिरात फलक कारवाईस दिरंगाई,दोन परवाना निरीक्षकांना नोटीस

pcnews24

वाकड येथील सोसायटीच्या आवारातील वाहने जाळली

pcnews24

पंजाब:अवघ्या सात दिवसात ‘प्रेमविवाहाची ‘ अखेर विष पिऊन.. नवरदेवाचे टोकाचं पाऊल.

pcnews24

उपायुक्त जगतापांना कारणे दाखवा नोटीस.

pcnews24

Leave a Comment