September 28, 2023
PC News24
सामाजिक

कामगारांना आर्थिकसक्षम करण्यात माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे सहकारमध्ये उल्लेखनीय काम –इरफान सय्यद

कामगारांना आर्थिकसक्षम करण्यात माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे सहकारमध्ये उल्लेखनीय काम –इरफान सय्यद

मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था यांचे माथाडी कामगाराला स्वतःच्या पायावर उभे करण्यात तसेच त्याला आर्थिकसक्षम करण्यात मोलाचे योगदान व त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत कामगार नेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था आणि मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खंडोबामाळ आकुर्डी येथे पार पडली.यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपाध्यक्ष रोहित नवले,सचिव सतीश कंठाळे, खजिनदार विजय खंडागळे,संचालक भिवाजी वाटेकर, पाराजी व्यवहारे, प्रकाश चोरे, सुभाष पुजारी, पुष्पा काळे, ललिता सावंत व्यवस्थापक प्रकाश पवार यांनी अहवालाचे वाचन केले. तर मातोश्री माथाड़ी कामगार सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कदम,उपाध्यक्ष बबन काळे,सचिव उद्धव सरोदे,खजिनदार सर्जेराव कचरे,संचालक गोरक्ष दुबाले, बाबासाहेब पोते, अशोक साळुंके, समर्थ नाईकवडे, विठ्ठल इंगळे, चंद्रकांत पिंगळे उपस्थित होते. व्यवस्थापक धर्मराज कदम यांनी अहवालाचे वाचन केले.

इरफान सय्यद पुढे म्हणाले की , पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी आहे. येथे असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात प्रामुख्याने माथाडी कामगार यांचा उल्लेख करावा लागेल. या माथाडी कामगाराला स्वतःच्या पायावर उभे करायला तसेच त्याला आर्थिकसक्षम करण्यात मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था यांचे योगदान कार्य उल्लेखनीय आहे. सहकारात अनेक बँका पतसंस्था मोठ्या संख्येने आहेत. पण, या सर्वात कामगारांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना पाठबळ देण्याची मानसिकता दिसून येत नाही, म्हणून कारखान्यात कामगार सोसायटी निर्माण झाल्या.पण, त्यात कायम आणि संघटित कामगार यांचा सहभाग जास्त होता व आहे .असंघटित क्षेत्रातील माथाडी कामगार यांच्या करिता 30 वर्षापूर्वी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज सन 2022-23 मध्ये दोन्ही पतसंस्था मिळून जवळपास 35 कोटीचा आर्थिक व्यवहार या पतसंस्थेत केला जातो ही खूपच उल्लेखनीय बाब आहे. सभासद कामगार यांच्या कुटुंबातील लग्न ,समारंभ विविध कार्यक्रम याकरिता महाराष्ट्र मजदुर संघटना व पतसंस्था यांच्या वतीने लवकरच एक सुनियोजित हॉल करण्यात येईल.

सरकारने शासन आदेश काढून पतसंस्था मोडीत काढण्याचा जो डाव आखला होता. त्यावेळी महाराष्ट्र मजदुर संघटना यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर मार्गाने हा अध्यादेश मागे घेण्यास लढा दिला.हा सहकारातील हा असंघटित कामगार यांच्या करिता उभा केलेला हा वृक्ष असच खूप मोठा व्हावा अशा शब्दात कामगार सय्यद यांनी पतसंस्थेचे कार्यकारी मंडळ व सभासद कामगार यांना शुभेच्छा देऊन संबोधित केले.

मातोश्री कामगार पतसंस्था यांचे एकूण भाग भांडवल 7 कोटी 22लाख असून जवळपास सुमारे 13 कोटी 60 लाख कर्ज वाटप यांनी केले आहे.रायरेश्वर माथाड़ी कामगार पतसंस्था यांचे एकूण भाग भांडवल 6 कोटी 16 लाख असून जवळपास सुमारे 9 कोटी 50 लाख कर्ज वाटप यांनी केले आहे. बदलत्या काळानुसार सुसज्ज संगणक प्रणाली , एस एम एस बँकिंग प्रिंटिंग पासबुक अशा आधुनिक सुविधा हे सभासद यांना पुरवतात.

सर्वसाधारण सभेत सामाजिक सहकार कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले मृत पावलेले सभासद , कार्यकर्ते , पतसंस्थेचे सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रायरेश्वर व मातोश्री माथाडी कामगार पतसंस्थाचे सल्लागार शिवसेना उपनेते इरफ़ान सय्यद, शिवसेना महिला आघाडी नेत्या सुलभा उबाळे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, नागेश व्हनवटे, प्रभाकर गुरव यांनी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार, संचालक सर्जेराव कचरे यांनी केले.

Related posts

ब्रेकिंग न्यूज -मराठा आरक्षणासाठी युवकाने घेतले विष.

pcnews24

पिंपरी-चिंचवड माझ्यासाठी लकी शहर,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा जाहीर सत्कार.

pcnews24

तळेगाव दाभाडे नगर परिषदे कडून रविवारी ई कचरा संकलन मोहीम.

pcnews24

सरकारचा जीआर जरांगे पाटील यांना अमान्य- आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन.

pcnews24

कोकण:’ब्लॅक पँथर’चे सिंधुदुर्ग येथील आंबोलीच्या जंगलात दर्शन.

pcnews24

Leave a Comment