September 23, 2023
PC News24
देश

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची103 वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. यंदा या पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे.

विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Related posts

काँग्रेस मध्ये शिवकुमार व सिध्दारमैय्या समर्थकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री पदावरून दावेदारी !

pcnews24

ग्राहक मंच तर्फे SBI ला 2 लाखांचा दंड

pcnews24

देश:लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवाराचे वय कमी करण्याची शिफारस;निवडणूक आयोगाची मान्यता?

pcnews24

मणिपूर:महिलांनी अतिरेक्यांना सोडण्यास भाग पाडले.

pcnews24

कुस्तीपटू अनुराग ठाकूरांच्या निवासस्थानी

pcnews24

पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; तर मुंबईत इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची स्टोरी

pcnews24

Leave a Comment