February 26, 2024
PC News24
सामाजिक

पिंपरी-चिंचवड:उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची जनसंवाद सभेत मागणी.

पिंपरी-चिंचवड:उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची जनसंवाद सभेत मागणी

शहरात डासांची संख्या वाढल्याने प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अनाधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.नागरिकांना महापालिकेच्या संबंधित असलेल्या तक्रारी अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये करण्यात येते.

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण 43 तक्रारवजा सूचनांची नोंद झाली. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे 11, 4, 2, 5, 2, 4, 8 आणि 7 तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.या मधे बसथांब्यांचे नुतनीकरण करण्यात यावे, ओपन जिमच्या साहित्यांची दुरूस्ती करण्यात यावी, पादचारी मार्गावर होणारे अतिक्रमण हटवावे, शहरात वाढणाऱ्या रहदारीचे योग्य नियोजन करावे, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन दुरूस्त करण्यात याव्यात, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा अशा विविध सुचनांचा प्रामुख्याने समावेश होता.
अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद (PCMC) सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते

Related posts

मनोज जरांगे यांचे उपोषण मागे;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण मागे घेतले.

pcnews24

महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार.शिंदे सरकार.

pcnews24

महापालिकेच्या वृक्षारोपण पंधरवडा उपक्रमास सुरुवात.

pcnews24

महापालिका शिक्षण विभागाच्या कोअर टीमचा दिल्ली अभ्यास दौरा..काय आहे शिक्षकांनची या दौऱ्या संदर्भातील ध्येय उद्दीष्टे?

pcnews24

शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.

pcnews24

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर करून साजरा.

pcnews24

Leave a Comment