पिंपळे सौदागर:उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम
पिंपळे सौदागर, ता. १० :वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. अचानक हवामानात होणारे बदलत व त्यामुळे वाढते तापमान आणि पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होत आहे. पुढील पिढीला ही समस्या भेडसावू नये, या उद्देशाने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोसायटी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला आहे. सावली देणारी, फुलझाडे व शोभेच्या झाडांसह विविध प्रकाराच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यातून परिसर हिरवा करण्याचा संकल्प करण्यात आला. त्याची सुरवात साई ऑर्चड सोसायटीपासून करण्यात आली. सोसायटीमधील रहिवाशांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, सोसायटीचे चेअरमन राजकुमार शर्मा, सेक्रेटरी अमित कोरे, खजिनदार योगेश सामंत, नीलेश अग्रवाल, दत्तात्रेय बनसोडे, हरीमोहन तिवारी, विपुल जोशी, कपिल पंडिता, कल्पेश रमानी, रिना रमानी, सुहास सतर्के, स्मिता सतर्के, राधेश्याम अग्रवाल आदी उपस्थित होते. सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसरात यापुढेही वृक्षारोपण मोहीम सुरूच राहणार आहे.असे उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी सांगितले.