पिंपरी चिंचवड:शहरात झालेल्या जाळ्या कोण साफ करणार??..’सारथी’वर नागरिकाचा संतप्त सवाल
पिंपरी चिंचवड शहरात होणारा विजेचा सावळा गोंधळ हा सर्वश्रुत आहे. पूर्ण वीजबिल भरून सुद्धा वीज मिळत नाही.अशी तक्रार केली जाते. या वारंवार वीज जाण्याचे मुख्य कारण ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड असून जो लूज केबलिंगमुळे होत असतो.
या अनधिकृत केबलिंगने होणारे स्मार्ट सिटीचे विद्रुपीकरण कोण थांबवणार?? विद्युत विभाग शांत का?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी या मोबाईल ॲपवर अशी तक्रार करण्यात आली आहे.
अमोल कालेकर (रा.रावेत)या नागरिकाने पालिकेच्या विद्युत मुख्य कार्यालय ब प्रभाग विद्युतविभागाकडे ही तक्रार केली आहे.यात त्यांनी म्हंटले आहे की घरात जाळ्या झाल्या की आपण लगेच त्या साफ करतो, पण या शहरात झालेल्या जाळ्या कोण साफ करणार हा माझा सारख्या नागरिकाला पडलेला प्रश्न असून सारथीवर तक्रार केल्यावर पालिकेचे आधिकारी नागरिकांशी हे काम कोणत्या डिपार्टमेंटचे असे म्हणत यावर वाद घालतात.
ब प्रभाग विद्युत कर्मचाऱ्यांना कॉल करू विचारले असता त्यांनी “हा पूर्ण शहराचा प्रश्न आहे,मी काही करू शकत नाही, मी cable काढल्या तर बंदूक घेऊन लोक मागे लागतात- तुम्ही आयुक्तांना भेटा .”असे उत्तर मिळाले.
जर महापालिका आधिकारी या शहरात सुरक्षित नाहीत तर सर्व सामान्य नागरिकांनी काय करावे?विजेचे पोल खाजगी व्यावसायिकांना शहराचे विद्रुपीकरण करत फुकट वापरण्यासाठी आहेत का?
स्मार्ट सिटी चे विद्रुपीकरण ह्या केबल्समुळे होत आहे तो आपण स्मार्ट सिटीचा टॅक्स भरून का भरायचा?
पालिकेचे आधिकारी इलेक्ट्रिसिटी Part XIV of Electricity Act, २००३ नुसार कारवाई करण्यासाठी का घाबरतात ?
नव्याने विकसित होणारा परिसर ह्याचे विद्रुपीकरण व विजेचा तोटा वेळीच थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे मागणी करणे गरजेचे आहे. तरच शासकीय स्थरावरचे प्रतिनिधी त्याचा विचार करतील.असेही या तक्रारीत नमूद केले आहे.
अमोल कालेकर यांनी केलेल्या तक्रारींचे आउटपुट सोशल मीडियावरही पोस्ट केले आहे.