September 23, 2023
PC News24
राजकारण

महाराष्ट्र:नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, ईडीकडूनआरोपांचा मसुदा सादर.

महाराष्ट्र:नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, ईडीकडूनआरोपांचा मसुदा सादर.

फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीने नवाब मलिक आणि अन्य तिघांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांच्यासमोर आरोपांचा मसुदा सादर केला. यामुळे नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात अन्य तीन आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते आणि या प्रकरणाची सुनावणी 24 जुलै पर्यंत राखून ठेवण्यात आली आहे. फौजदारी खटल्यातील खटला सुरू करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून प्रथमदर्शनी पुराव्याच्या आधारे तपास यंत्रणा आरोपींवर कोणती कलमे लावू शकतात याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. यानंतर न्यायालय आरोपीला खटल्यादरम्यान त्याच्यावर लावलेल्या आरोपांचे वाचन करेल व त्यानंतर खटला सुरु होईल.

65 वर्षीय मलिक यांनी आपण किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याने आपली तात्काळ वैद्यकीय जामिनावर सुटका करावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. मलिक गेल्या वर्षीपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. परंतू, गेल्या महिन्यात एकलपीठाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता.

Related posts

‘रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य’ : एच.डी.देवेगौडा.

pcnews24

देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली!!

pcnews24

पुसेसावळी, सातारा दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांकडून सतर्कतेचे आदेश.

pcnews24

‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ इंडियाची नवी थीम काय म्हणाले ठाकरे,खरगे, नितीशकुमार, केजरीवाल नक्की वाचा.

pcnews24

खंडणीची धमकी देणाऱ्यास पोलिसांकडून अटक, आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, मनसेचे नेते वसंत मोरे अशा राजकीय नेत्यांना केले होते टार्गेट.

pcnews24

भाजपला मुळासकट फेकून दिले…कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल

pcnews24

Leave a Comment