September 23, 2023
PC News24
अपघात

चाकण शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात, दोन जण ठार

चाकण शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात, दोन जण ठार

चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरला कार धडकून भीषण अपघात झाला आहे त्यामध्ये कारमधील 2 जण जागीच ठार झाले आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव येथे मोहितेवाडी ता.खेड हद्दीत रस्त्याच्या लगत थांबलेल्या कंटेनरला चारचाकी कार धडकून हा अपघात झाला.रविवारी (दि.9) रात्री 11 दरम्यान ही घटना घडली.

चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव येथे मोहितेवाडी हद्दीत हॉटेल जगदंबा समोर कंटेनर (MH43Y0304) उभा होता. पाठीमागून भरधाव वेगात आलेली कार (MH14JU4248 )कंटेनरवर आदळली.यामध्ये कार चालक आदित्य मेमाणे ( वय 27, रा. कुरुळी ) व शेजारी बसलेले अमोल लोमटे ( वय 32, रा. पाथर्डी, उस्मानाबाद ) दोघेही गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चाकण पोलिसांनी अपघातात ठार झालेल्या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related posts

निगडित पलटी झाला गॅस टँकर

pcnews24

चाकण : नाशिक पुणे महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीने गमावला जीव

pcnews24

जुन्या मुंबई – पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात, एक ठार दोन जखमी

pcnews24

पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, दोघांची प्रकृती गंभीर

pcnews24

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ बॉम्ब स्फोट.

pcnews24

वडगाव फाटा (मावळ) येथील कंपनीमध्ये केमिकल गळती, परिस्थीतीवर नियंत्रण

pcnews24

Leave a Comment