February 26, 2024
PC News24
गुन्हा

तळेगांव: आणखी दोन टोळ्यांवर मोका, रामा पाटील व कीटक भालेराव यांचा समावेश, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

तळेगांव: आणखी दोन टोळ्यांवर मोका, रामा पाटील व कीटक भालेराव यांचा समावेश, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

 

रावेत परिसरातील रामा पाटील तर तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 (मोका) नुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

 

रावेत परिसरातील रामा पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांवर गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, कट रचणे, बेकायदेशीर जमाव जमवून सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, चोरी करणे, चोरीचा माल घेणे असे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.टोळी प्रमुख रामा परशुराम पाटील (वय 29, रा. थेरगाव), टोळीतील सदस्य प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार (वय 32, रा. रहाटणी), नीरज रवींद्र आडाणे (वय 28, रा. मुदखेड, नांदेड) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

 

तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि त्याच्या पाच साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, दुखापत, विनयभंग, खंडणी मागणे, बेकायदेशीर हत्यार तसेच अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख जय उर्फ कीटक प्रवीण भालेराव (वय 19, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव दाभाडे), टोळीतील सदस्य ऋतिक उर्फ दाद्या पोपट मेटकरी (वय 22, रा. देहूरोड), विशाल शिवाजी गुंजाळ (वय 18, रा. तळेगाव दाभाडे), प्रदीप ज्ञानोबा वाघमारे (वय 22, रा. वडगाव मावळ), वैभव रामकृष्ण विटे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

 

वरील दोन्ही टोळ्यांनी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सत्यवान माने, शिवाजी गवारे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी,अमित गायकवाड, विकास तारू यांनी केली.

Related posts

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

रावेत येथील हॉटेल व्यवसायिकाचा पुण्यामध्ये खून

pcnews24

तळेगाव:लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या.

pcnews24

भोसरी:कंपनीतील व्हिडीओ व्हायरल करण्याची महिलेला धमकी

pcnews24

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

pcnews24

वाकड: आयुर्वेद स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई.

pcnews24

Leave a Comment