तळवडे येथील कंपनीच्या कामगाराने चोरले 23 लाखांचे साहित्य
जोतीबनगर, तळवडे : पिंपरी चिंचवड येथील The डेकॉर स्टुडीओ या कंपनीतून तेथेच काम करीत असलेल्या कामगाराने तब्बल 23 लाख रुपयांचे साहित्य चोरले करण्याची घटना घडली आहे.
फेब्रुवारी ते 27 मार्च या कालावधीत शाहरुख गफर शेख (वय 30, रा. कोंढवा, पुणे) याने कंपनीत काम असताना एक महिन्याच्या कालावधीत कंपनीतून पॅनेल सॉ आणि डस्ट कलेक्टर, एज बायडिंग अॅड कॉम्प्रेसर या मशिन आणि कंपनीतील कॉट, कपाट, प्लाउड असे एकूण 23 लाखांचे साहित्य चोरून नेले असल्याचे लक्षात आल्यावरून मोहम्मद आरिफ आयुब शेख (वय 31, रा. धानोरी रोड, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत.