February 26, 2024
PC News24
आंतरराष्ट्रीय

भारतात मुस्लिमासोबत भेदभाव केला जातो ही एक अफवा : अजित डोवाल

भारतात मुस्लिमासोबत भेदभाव केला जातो ही एक अफवा : अजित डोवाल

दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात सौदी अरबचे माजी न्याय मंत्री अल-ईसा यांना निमंत्रण होते. त्यावेळी अजित डोवाल देखील उपस्थित होते.
अल-ईसा यांना जगभरातील नरमपंथी इस्लामचा आवाज मानले जाते. ते पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यावेळी बोलताना म्हणाले की, भारतात कोणासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाहीय. जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतातील मुस्लिमांची संख्या ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आकडा इस्लामिक को ऑपरेशनच्या ३३ देशांच्या एकूण लोकसंख्येएवढा असल्याचे डोवाल यांनी सांगितले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, उद्योगपती जॉर्ज सोरोस ते आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. डोवाल यांनी हे फेटाळून लावताना ही एक अफवा असल्याचेही म्हटले आहे. भारतात कोणत्याही जाती-धर्म आणि वर्णभेदाशिवाय संपूर्ण स्वातंत्र्याने जगता येते, असे ते म्हणाले.

इस्लाम भारतात 7 व्या शतकात आला. मुस्लिम सखोल समज असलेल्या हिंदूंमध्ये मिसळले. त्यातून एक नवीन समाज निर्माण झाला आणि विकसित झाला. हे लोक एकत्र कसे आले, हे समजून घेण्यात इतिहासकार चुकले आहेत. त्यांचे लक्ष केवळ राजकीय घडामोडीपुरतेच मर्यादित राहिले आहे, असे प्रत्युत्तर डोवाल यांनी दिले.

Related posts

जपान दौऱ्यावर पंतप्रधान रवाना.

pcnews24

अंतराळातील विशाल उल्का पृथ्वीच्या दिशेने अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ यांची भविष्यवाणी.

pcnews24

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने गाठली पदकाची शंभरी;रेकॉर्ड ब्रेक पदकांची कमाई, खेळाडूंच्या यादीसह.

pcnews24

क्लाउड बिल भरण्यास ट्विटर चा Googleला यांचा नकार.. प्लॅटफॉर्मर अहवाल

pcnews24

Tit-for-tat;भारताने कॅनडाच्या मुत्सद्द्याला ५ दिवसांत देश सोडण्यास सांगितले.

pcnews24

World Cup 2023 : भारताने आपल्या पारंपरिक दुश्मनाला केले चारीमुंड्या चीत

pcnews24

Leave a Comment