March 1, 2024
PC News24
गुन्हा

पिंपरी चिंचवड पोलिसांचे सलग दोन दिवस ‘ऑल आऊट ऑपरेशन’

पिंपरी चिंचवड पोलिसांचे सलग दोन दिवस ‘ऑल आऊट ऑपरेशन’

रविवारी रात्री ऑल आऊट ऑपरेशन’ नं 1 केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 10) रात्री दहा ते मंगळवारी (दि. 11) पहाटे दोन या कालावधीत सलग दुसऱ्या दिवशी रात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवले. शेकडो गुन्हेगारांची धरपकड पोलिसांनी केली. यामध्ये 71 पोलीस अधिकारी आणि 331 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

यामध्ये पोलिसांनी 728 संशयित वाहने चेक केली. पोलीस रेकॉर्डवरील 386 आरोपी चेक केले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे 143 वाहनांवर कारवाई करुन दंड वसूल केला आहे. हिस्ट्रीशिटर 27 आरोपी चेक केले. पाहिजे असलेले 17 आरोपी अटक केले आहेत. 167 संशयित इसम चेक केले. एन. बी. डब्ल्यु 10 वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत पाच कारवाया करुन गुन्हे दाखल केलेले आहेत. आर्म अॅक्ट प्रमाणे तीन कारवाया करून त्यात दोन तलवार, दोन लोखंडी कोयते, दोन सुरे जप्त केली आहेत. त्यात पाच आरोपींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरीचे व वाहन चोरीचे पाच गुन्हे उघड करुन पाच आरोपींना अटक करण्यात आली.त्यांच्याकडून 102 रिक्षा, दोन मोटारसायकल, एक मोबाईल फोन, बिल्डींग मटेरियल साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सीआरपीसी कलम 107 प्रमाणे चार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

जुनी भांडणे सोडवल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; तिघांना अटक

pcnews24

पिंपरी: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न… पतीला अटक

pcnews24

पिंपरी चिंचवड:तरुणींच्या छेडछाडीबाबत पोलिस तात्काळ कारवाई करणार”- विनयकुमार चौबे- पोलिस आयुक्त.

pcnews24

पिंपरी चिंचवड:भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनला दिली नाही तर घरमालकावर गुन्हा

pcnews24

पुण्याच्या बाणेरमधे दाजीची मेव्हण्याकडून हत्या.

pcnews24

जबरी चोरी व घरफोडी करणारी आंतर राज्यीय टोळी जेरबंद आरोपींकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस व 35,83,300 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त.

pcnews24

Leave a Comment