महाराष्ट्र:NCP सुळे गटाच्या प्रचारप्रमुखपदी खासदार अमोल कोल्हे यांची नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुळे गट प्रचारप्रमुखपदी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हे यांना नियुक्तीचे पत्र आज देण्यात आले.
यावेळी कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार हेमंत टकले, युवक अध्यक्ष मेहबुब शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी होणा-या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांकरिता डॉ. कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेशासाठी ही नियुक्ती केली आहे.पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे असे जयंत पाटील यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
आदरणीय शरद पवार, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो! आपण सर्वांनी दाखविलेला हा विश्वास नक्कीच सार्थ ठरवेल अशी प्रतिक्रिया डॉ. कोल्हे यांनी नियुक्तीनंतर दिली.