राष्ट्रीय:50 वी GST परिषदेची बैठक संपन्न, ऑनलाईन गेमींग महागणार तर कॅन्सरच्या औषधांना मिळणार सुट
नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 50 व्या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
यामध्ये ऑनलाइन गेमिंगची कर आकारणी, युटिलिटी वाहनांची व्याख्या, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) नोंदणी आणि दावा करण्याचे नियम, सिनेमा हॉलमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या आयातीवर सूट आणि कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश होता.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
– ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी
– कर्करोगावरील औषधांना जीएसटीमधून सूट
– परदेशातून वैयक्तिक वापरासाठी आणलेल्या कर्करोगाच्या औषधावर GST सूट
– सिनेमागृहातील खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी कपात
– कॅन्सरच्या आयातीच्या औषधांवर IGST नाही
– जीएसटी न्यायाधिकरणाच्या स्थापनेला परिषदेची मान्यता