महाराष्ट्र:वेदांतासोबत संयुक्त करारनाम्यातून फॉक्सकॉन कंपनीची माघार
फॉक्सकॉन समूहाने वेदांता सोबतच्या भागीदारीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प पुण्याच्या तळेगावात प्रस्तावित होता. पण अखेरच्या क्षणी प्रकल्प गुजरातला हलवला गेला. दरम्यान, फॉक्सकॉन समूहाने माघार घेतली असली तरी हा प्रकल्प आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, अशी ग्वाही वेदांताने निवेदन जारी करुन दिली आहे.
तब्बल दीड लाख कोटींचा Vedanta Foxconn सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा प्रकल्प गेल्या वर्षी गुजरातला आला होता. त्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी वेदांतासोबत संयुक्त करारनाम्यातून तैवानच्या बलाढ्य फॉक्सकॉन कंपनीने माघार घेतली आहे. फॉक्सकॉनने निवेदन जारी करून कंपनी संयुक्त करार नाम्यातून माघार घेत असल्याची घोषणा केलीये. दुसरीकडे फॉक्सकॉनच्या माघारीनंतरही प्रकल्प यशस्वी पूर्ण करू, असं वेदांताने म्हटलंय. रॉयटर्सने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.