September 23, 2023
PC News24
गुन्हा

पुणे रेल्वे स्टेशच्या भुयारी मार्गात महिलेचा विनयभंग

पुणे रेल्वे स्टेशच्या भुयारी मार्गात महिलेचा विनयभंग

पुणे रेल्वे स्टेशनच्या हद्दीत संतापजनक घटना घडली आहे.रेल्वेचा प्रवास केल्यानंतर आपल्या पतीसोबत पुणे स्टेशन परिसरातून घरी जात असताना पुणे रेल्वे स्टेशच्या भुयारी मार्गात एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत, महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी २३ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी पहाटे पतीसोबत महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्यात रेल्वे स्टेशनवर उतरली. तेथून हे दाम्पत्य रेल्वे स्टेशनलगतच्या भुयारी मार्गातून पायी निघाले होते. भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरून उतरताना महिलेच्या पतीचा पाय घसरला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारल्यानंतर अनोळखी तरुणाने संतापत होत महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेचा पती आणि आरोपी तरुणामध्ये झटपट झाली आणि तरुण तिथून फरार झाला.

दरम्यान, बाहेरगावाहून आलेले अनेक प्रवासी, नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. महिलेच्या विनयभंगाच्या घटनेवरून भुयारी मार्गामध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related posts

कामगाराच्या सतर्कतेने बँकेतील चोरीचा प्रयत्न फसला

pcnews24

‘Life story’ दर्शना पवारचा व्हिडिओ व्हायरल.

pcnews24

महिलेशी मोबाईलवर अश्लील वर्तन, पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल,आयपीएस अधिकारी…

pcnews24

पुणे गुन्हे अन्वेषण विभाग:पाकिस्ताननी गुप्तहेरांच्या संपर्कातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पोलिसांच्या जाळ्यात

pcnews24

वडलांना मारल्याच्या रागातून केली निर्घृण हत्या.

pcnews24

फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून महिलेस ब्लॅकमेल

pcnews24

Leave a Comment