September 28, 2023
PC News24
अपघात

सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात

सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात

नुकतीच समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे.सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे अंदाजे ३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर १८ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे
सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

सप्तश्रृंगी घाटात ST बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात नेले जात आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून अपघात स्थळाच्या दिशेने रवाना झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

Related posts

रक्षाबंधनादिवशी भाऊ-बहिणीचा धक्कादायक अपघात; भाऊ जखमी,तर बहिण….

pcnews24

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली.. 21 मृतदेह बाहेर;135 जण अजूनही बेपत्ता

pcnews24

महाराष्ट्र:समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात.

pcnews24

केदारनाथ : गौरीकुंड येथे दरड कोसळली;19 जण बेपत्ता

pcnews24

कल्याण – भीमाशंकर( पुणे) बसला अपघात,बस२० फूट दरीत कोसळली

pcnews24

काळेवाडी फाटा ब्रिजवर भरधाव दुचाकीस्वाराचा मृत्यू

pcnews24

Leave a Comment