September 28, 2023
PC News24
राज्य

महाराष्ट्र: नितेश राणेंच्या वक्तव्याने तृतीयपंथी समाज आक्रमक, त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्र: नितेश राणेंच्या वक्तव्याने तृतीयपंथी समाज आक्रमक, त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेना ( उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ म्हणत जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला आहे. टीका करताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा मॉर्फ केलेला फोटो ट्विट करत ‘मर्दानगी वर कलंक ! **#च्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!’ अशी टीका केली होती. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेनंतर आता तृतीयपंथीय समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथीय समाजातील काही आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

तृतीयपंथी हक्क अधिकार संषर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील, निकिता मुख्यदल यांनी आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान कालपासून सुरु केलेलं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस करत असून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचा आरोप शमीभा पाटील यांनी केला आहे. तर पोलिसांनी दडपशाही करून माझ्या आंदोलक भगिनी यांना जर काही झालं तर याला पुणे पोलीस जबाबदार असतील, असे शमीभा पाटील म्हणाल्या.
या आंदोलनापूर्वी नितेश राणे जिथं दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळ फासू, असा गंभीर इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आमदार होण्यासाठी तुम्हाला आमचं, आमच्या नातेवाईकांचे मतदान चालते आमचं रक्त पिऊन आमच्याच जेंडरचचा वापर तुम्ही शिवी म्हणून करत आहात, आम्ही भारताचे नागरिक नाहीत का ? असा सवाल या आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तर नितेश राणेंना सोज्वळपणा, बोलण्याची पद्धत शिकायची असेल तर चार दिवस आम्हा हिजड्यांच्या येऊन राहा, असा घणाघात देखील तृतीयपंथीय आंदोलकांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे.

Related posts

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

pcnews24

राम मंदिरासाठी पाठवलेलं गडचिरोलीतील लाकूड 1000 वर्षांपर्यंत टिकणार, ऊन-पाऊस, किडीचा प्रभाव नसेल

Admin

भारतीईंना पीसीन्युज२४ चा सलाम !!! 54 व्या वर्षी दहावीत मिळवले 54 टक्के गुण

pcnews24

अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांचा घेराव;सर्व पक्षीय नेत्यांना धास्ती

pcnews24

राष्ट्रवादी काँग्रेस चा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द

pcnews24

तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी होमपीचवर खेळणार, ‘या’ 5 खेळाडूंवर असणार ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी

Admin

Leave a Comment