September 28, 2023
PC News24
धर्म

रहाटणी येथील तीन महिलांकडून ख्रिश्चन धर्मामध्ये मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न… वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

रहाटणी येथील तीन महिलांकडून ख्रिश्चन धर्मामध्ये मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न… वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे धर्मांतराबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीनही महिलांना नोटीस बजावत समज दिली आहे. बायबल वाचा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा असे म्हणून ३९ वर्षीय तक्रारदार यांना विश्वासात घेऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न तीन महिलांनी केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे
३९ वर्षीय तक्रारदार यांच्या घरी तीन महिला वारंवार येऊन तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा असे म्हणून बायबल वाचून दाखवत होत्या. याबाबत अनेकदा तक्रारदार महिलेने आम्हाला हे काही समजत नाही. आम्हाला या गोष्टीमध्ये पडायचं नाही असं समजावून सांगितलं होत. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तीनही महिला तक्रारदार यांच्या घरी बळजबरीने शिरल्या, त्यांनी तक्रारदार यांना पुन्हा अशाच प्रकारची बळजबरी करत येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास सांगत मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

हे सर्व सुरू असताना तक्रारदार यांनी संबंधित तीनही महिलांना बाहेर जाण्यास सांगितलं. परंतु, त्या बाहेर जात नव्हत्या, अखेर त्यांच्या पुतण्याला बोलवून घेऊन महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या जात नसल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं.

वाकड पोलीस ठाण्यात संबंधित महिलां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही महिलांना वाकड पोलिसांनी नोटीस बजावत समज दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिली.

Related posts

आळंदीत माऊलींच्या मंदिरात वारीच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना..पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट

pcnews24

पुणे : आंबेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोबाईल वापरण्यास बंदी.

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

आणखी पंधरा दिवस थांबा मग कळेल…

pcnews24

देश;अयोध्या-रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीख ठरली.

pcnews24

११ व्या शतकातील ऐतिहासिक प्राचीन पळसनाथाचे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

pcnews24

Leave a Comment