महत्वाचे!!! आज काही भागात दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता गुरुवारी दि 13 रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
या दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघी या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.