February 26, 2024
PC News24
Other

उत्तर भारतात ढगफुटी, पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील ११ पर्यटक अडकले

उत्तर भारतात ढगफुटी, पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील ११ पर्यटक अडकले

उत्तर भारतात पावसाने हाहाकार उडविल्याने देशभरातील हजारो पर्यटक हिमाचलप्रदेशात अडकले आहेत. त्यात पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश आहे. पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत. हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत असून दळणवळण बंद झाले असले तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे म्हणाले की, पिंपरी चिंचवडमधील पाच पर्यटक रविवारी मनालीतून कुलूकडे जात असताना पावसामुळे रस्ते बंद असल्याने मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मंगळवारी तेथील परिस्थिती सुधारल्यावर याच पर्यटकांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून घरी संपर्क साधला. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. हिमाचल सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासन संपर्कात असून सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. तेथील दळणवळण ठप्प झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हडपसरमधील मगरपट्टा सिटीतील एका खासगी कंपनीतील पाच जण हिमाचलमधील कसोल येथे अडकले आहेत. गुंतूर या कसोल शहराच्या खालील भागात असलेल्या लष्कराच्या तळावरून त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. तेथून ते पुढील प्रवास करणार असल्याचेही त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. हिमाचलमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही बनोटे यांनी केले.

Related posts

महत्त्वाची बातमी: इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये पिंपरी चिंचवड देशात दुसरे तर राज्यात पहिले- शेखर सिंह.

pcnews24

पिंपरी:दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा-संदीप वाघेरे युवा मंचतर्फे आयोजन

pcnews24

महानगरपालिकेत होणार आशा स्वयंसेविका पदांची भरती.

pcnews24

पिंपरी चिंचवडमधे घरगुती गॅसचा काळाबाजार.

pcnews24

‘प्लेस्को दांडिया नाईटस’ मध्ये 10 हजारांपेक्षा अधिक दांडिया प्रेमींनी केली ऑनलाईन नोंदणी -पिंपळे सौदागर येथे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन

pcnews24

भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश, महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन एमेरिटस केशब महिंद्रा यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

pcnews24

Leave a Comment