September 23, 2023
PC News24
तंत्रज्ञान

भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज,चांद्रयान-3 मोहिमेचे 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपण

भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज,चांद्रयान-3 मोहिमेचे 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपण

भारताची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ही आहे, जी 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल.

चांद्रयान 3 ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान 3 इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान आहे. याआधी चांद्रयान 1 व चांद्रयान 2 यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान 3 चंद्रावरून उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करेल.

चांद्रयान-3 LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून चांद्रयान 3 लाँच व्हेइकलसोबत म्हणजेच LVM3 रॉकेटसोबत जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरु आहे. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान 3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा महत्त्वाचा भाग चांद्रयान-3 हा चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 चा पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून चांद्रयान 3 साठी मदत घेण्यात येणार आहे. चांद्रयान 3 यूएन राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान 3 च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणं पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे.

Related posts

भारताची महत्वाकांक्षी ऐतिहासिक भरारी; मिशन चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं (आकर्षक फोटो सह).

pcnews24

भारतातला पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा सर्वात महागडा.

pcnews24

देश:चांद्रयान-३चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश;महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला.

pcnews24

तुळजाभवानी मंदिर परिसराचं रुप पालटणार,राज्य सरकारचा मोठा निर्णय,मंदिरासाठी१३८५ कोटींचा निधी मंजूर.

pcnews24

चिंचवड आनंदवन सोसायटी मधे बहरली सफरचंद,बागप्रेमींची आवर्जून भेट

pcnews24

AI मध्ये करिअर करणाऱ्यांसाठी गुडन्यूज

pcnews24

Leave a Comment