September 23, 2023
PC News24
वाहतूक

संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आज (दि.13) पिंपरी चिंचवड मध्ये, वाहतुकीत बदल.

संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आज (दि.13) पिंपरी चिंचवड मध्ये, वाहतुकीत बदल

पंढरपूर येथे आषाढी सोहळा पार पडल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी परतीचा प्रवास करत आहे. पालखी गुरुवारी (दि. 13) पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

तळवडे : खंडेलवाल चौक ते देहुकमान परंडवाल चौक साईराज हॉटेल चौक दरम्यान जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – कॅनबे चौक- तळवडे गावठाण त्रिवेणीनगर-भक्ती शक्ती चौक मार्गे इच्छित स्थळी जातील

देहूरोड : मुंबई-पुणे जुना हायवे वरील सेंट्रल चौकातून कमान येथून देहूकडे व भक्तीशक्ती चौकाकडे जाणाऱ्या जड / अवजड वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – सर्व प्रकारची वाहने सेंट्रल चौक मामुर्डी किवळे भुमकर चौक डांगे – चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.देहुगाव रिंग रोड दरम्यान जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पालखी पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाल्यापासून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वेळोवेळी हे बदल करण्यात येणार आहेत.

निगडी : खंडोबामाळ चौकाकडून टिळक चौकाकडे जड वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – खंडोबा माळ चौकातून डावीकडे वळून चिंचवड स्टेशन- महावीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.त्रिवेणीनगर चौकाकडून भक्ती शक्ती चौकाकडे जाण्यास जड / अजवड वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – त्रिवेणीनगर चौक- दुर्गानगर चौक मार्गे थरमॅक्स चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

चिंचवड : महावीर चौकाकडून खंडोबामाळ, निगडीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग महावीर चौक ते चाफेकर ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.चापेकर चौक एल्प्रो मॉलकडून लिंकरोडला जाणारा रोड सर्व प्रकारच्या जड / अवजड वाहनासाठी बंद राहील. (ही वाहने अहिंसा चौक येथून डावीकडे वळून महावीर चौकाकडून इच्छित स्थळी जातील) मोरया हॉस्पिटल चौक लिंकरोड कडून चिंचवड गावाकडे येणारी जड / अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. पर्यायी रस्ता – मोरया हॉस्पिटल चौक गांधीपेठ मोरया गोसावी मंदिर कडून रिव्हर या चौकाकडून इच्छित स्थळी जाता येईल.एस. के. एफ. चौक चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाणारे जड़ / अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. पर्यायी रस्ता – सदरची वाहने ही बिजलीनगर चौक मार्गाने इच्छित स्थळी जातील.
पिंपरी : पिंपरी पुल (पिंपरी पुलावरुन शगुन चौकाकडे किंवा भाटनगरकडे येणारे वाहनांचा रस्ता बंद करण्यात येणार आहे) पालखी भाटनगरपासून स्मशानभूमी पिंपरीकडे जाईपर्यंत वाहतुक बंद करण्यात येत आहे. हनुमान मंदीर चौक (पिंपरी गावाकडे येणारी वाहतूक अवजड वाहने मदर टेरेसा उड्डाणपुलावरुन काळेवाडी मार्गे. पिंपरी गावाकडे येणारी व पिंपरी गावातुन बाहेर पडणारी वाहतूक डेअरी फार्म व साई चौक भुयारी मार्गे. भाटनगर कडून येणारी पिंपरी गावाकडे येणारी वाहतूक रिव्हर रोड कराची चौक साई चौक मार्गे पिंपरी गावाकडे. साई चौकाकडून शगुन चौकाकडे येण्यास जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. काळेवाडी पुलाकडून डिलक्स चौकाकडे येण्यास जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

भोसरी : जुना पुणे मुंबई हायवेवरील नाशिक फाटाकडून पिंपरी बाजूकडे सर्व अवजड वाहनांस प्रवेश बंदी. पर्यायी मार्गा वरील सर्व जड अवजड वाहने नाशिक फाटा येथून उजवीकडे वळून भोसरी मार्गे इच्छित स्थळी जातील. नाशिक फाटा येथून डावीकडे वळून सांगवी मार्गे इच्छित स्थळी जातील.

Related posts

मुंबई शहरातील प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग.

pcnews24

मराठा आंदोलनामुळे प्रवाशांना मनस्ताप तर STचे १५ कोटींचे नुकसान

pcnews24

मध्य रेल्वेत मेगा भरती.

pcnews24

सरकारची कमाई झाली दुप्पट!!

pcnews24

मेट्रोला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद-6दिवसात 50लाखांची कमाई.

pcnews24

पुणे:पीएमपीएमएल कडून मेट्रो पूरक बस सेवेचे नियोजन.

pcnews24

Leave a Comment