March 1, 2024
PC News24
सामाजिक

1 ते 5 ऑगस्ट दरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व.. परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन.

1 ते 5 ऑगस्ट दरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व.. परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.या कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करण्यात येणार असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, रोजगार मेळावा, तज्ञ मंडळीचे परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबीर, महापालिकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची सोय अशा विविध उपक्रमांद्वारे निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वासाठी महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारती मधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे पूर्व नियोजन बैठक पार पडली.

यामधे विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम नियोजनाबाबत सूचना केल्या. त्यामध्ये दर्जेदार कार्यक्रम असावे, पुतळा परिसरात साफसफाई करणे, कार्यकमात खेळाडूंना सन्मानित करावे, रोजगार मेळाव्याचे आयोजन, आदर्श मातांना सन्मानित करावे, परिसंवाद साठी नामांकित व्यक्तींना निमंत्रित करावे, विद्यार्थी आणि महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती कार्यक्रमात द्यावी आदी सूचना बैठकीत प्राप्त झाल्या.

या बैठकीस उपआयुक्त रविकिरण घोडके, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, माजी नगरसदस्य सचिन चिखले ,माजी नगरसदस्या सुमन नेटके, अनुराधा गोरखे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, व्ही. एम. मांडरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, मनोज तोरडमल, संजय ससाणे, अरुण जोगदंड, हनुमंत कसबे, नितीन घोलप, सुनील भिसे, धम्मराज साळवे, शिवाजी साळवे, बापू घोलप, युवराज दाखले, चंद्रकांत लोंढे, सतीश भवाळ, विशाल कांबळे, ईश्वर कांबळे, विनोद गायकवाड, राजेंद्र साळवे, सुरेश पंचरास, गणेश कापसे, अशोक देवेंद्र, सतीश आडागळे, माणिक खंडागळे, विजय कांबळे, भीमराव कांबळे, नितीन कांबळे, विनोद कापसे, सचिन दुबळे, दशरथ सकट, दीपक लोखंडे, अविनाश कोबीकर, उत्तम कांबळे, विकास डोरनारळीकर, प्रभू जाधव, संतोष शिंदे, प्रदीप कळसे, किशोर हातागळे, सोपान खुडे, शिवराज निकाळजे, मयूर घोलप, स्वप्नील वाघमारे, अक्षय उदगीरे, राकेश खिलारे, अर्जुन कदम, दीपक चांदणे, अनिल तांबे, रामदास कांबळे, रवींद्र पाटोळे, शशी इंगळे, कृष्णा कारकुड, साहिल करीमखान, जॉय गायकवाड, संदीप घोबाडे, निलेश देवकुळे, शिवाजी भिसे, अनिल सिंग, विष्णू सरपते, श्रेयस लाटकर, योगेश लोंढे, विशाल कसबे, धुराजी शिंदे, बापूसाहेब गायकवाड, तात्या सोनवणे, अक्षय दुनघन, साहेबराव साळवे, कृष्णा जाधव, महेंद्र चौधरी, विठ्ठल कळपे, कैलास पाटील, संदीप जाधव, लक्ष्मण वैरागे, राजू अभिके, संतराज आरवडे, बापूसाहेब केदारी, सतीश पवार, बापू घोलप, महेंद्र गायकवाड, सामजिक कार्यकर्त्या मंदाकिनी गायकवाड, सुप्रिया सोळांकुरे, केसरबाई लांडगे, सविता आव्हाड, ललिता मुजमुले आदी उपस्थित होत्या.

Related posts

दिवे घाटात बिबट्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

pcnews24

युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी पिंपरीच्या गौरव चौधरीची आणि गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात बेपत्ता लोकांचे प्रमाण वाढले, महिलांचे प्रमाण अधिक

pcnews24

महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश मराठा समाजावर अन्याय करणारा- न्यायप्रिय अहवाल काढण्याची मागणी विजयकुमार पाटील.

pcnews24

कर्नाटक, बागलकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनानं हटवल्यामुळे तणाव.

pcnews24

स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका 1 लाख रुपये

pcnews24

Leave a Comment