September 23, 2023
PC News24
राजकारण

ठाकरे गटाची गळती सुरुच,…सहा पैकी दोन आमदार आले उर्वरित चार कोण? : उदय सामंत

ठाकरे गटाची गळती सुरुच,…सहा पैकी दोन आमदार आले उर्वरित चार कोण? : उदय सामंत

शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या दाव्याने ते चार आमदार नेमके कोण याविषयीची चर्चा वाढली आहे अमरावती दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ठाकरे गटाचे सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आम्ही आधीच सांगितले होते. यातून दोघे शिंदे गटात आले आहेत. अद्यापही चार आमदार आमच्या संपर्कात आहेत.

विधानपरिषदेत ठाकरें सोबत असलेल्या आमदारांपैकी मनीषा कायंदे यांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसां मध्येच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे देखील एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत सेनेत गेल्या. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हे मोठे धक्के बसले होते. आता उदय सामंतांनी आणखी चार आमदार येणार असल्याचं म्हटल्यानं ते आमदार कोण असतील याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Related posts

ब्रेकिंग न्यूज:राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटात ?

pcnews24

IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार

Admin

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा रविवारी पिंपरी चिंचवड शहरात.

pcnews24

महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ.मनोज सैनिक.

pcnews24

आम्ही थांबणार नाही – शरद पवार.

pcnews24

पोलीस होणाऱ्या साईनाथची नक्षलींकडून निर्घृण हत्या,युवकांच्या प्रगतीला नक्षलींकडून विरोध.

pcnews24

Leave a Comment