कल्याण – भीमाशंकर( पुणे) बसला अपघात,बस२० फूट दरीत कोसळली
कल्याणवरून भीमाशंकर ला जाणारी एसटी महामंडळाची बस एम एच 14 बी टी 1582 गिरवली गावच्या हद्दीत पुलावरून खाली वीस फुट खोल दरीत कोसळण्याची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात एसटी बसमधील दोन प्रवासी जखमी झाले असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका चालक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घोडेगाव जिल्हा पुणे येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांनी दिली. वेळेतच प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन मदत झाल्याने मोठी दुर्घटना टळली.