पिंपरी चिंचवड:शहरात होत असलेल्या अवजड वाहतुक मार्गात मोठे बदल
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पिंपरी चिंचवड शहर परिसरात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. शहराचा विस्तार देखील वेगाने होत आहे. चाकण, तळेगाव एमआयडीसी तसेच तळवडे, हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी कात्रज ते रावेत या राष्ट्रीय महामार्गावरून कामगार ये-जा करीत असतात. त्याव्यतिरीक्त त्यात तळेगाव, चाकण तसेच तळवडे, हिंजवडी आयटीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वाहनांचा अतिरीक्त भार पडत आहे. यातच शहर परिसरात होणारी अवजड वाहतुक यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते हे लक्षात घेऊन अवजड वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.सकाळी आठ ते अकरा व दुपारी पाच ते नऊ या वेळेपर्यंत या वाहतुकीस प्रवेश बंद असेल.
जाणून घ्या कोणत्या मार्गावर असेल अवजड वाहनांना सकाळी आठ ते अकरा व दुपारी पाच ते नऊ पर्यंत प्रवेश बंद
माई वडेवाले चौक ते बनाचा ओढा तसेच बनाचा ओढा ते माई वडेवाले चौक-
जय भारत चौक (वैशाली स्वीट सेंटर चौक) ते आनंदनगर कॉसमॉस सोसायटी दरम्यान
नाशिकफाटा चौक ते हॅरीष ब्रिज व हॅरीष ब्रिज ते नाशिकफाटा चौक दरम्यान सर्व प्रकारच्या जड / अवजड / ट्रॅव्हल्स बसेस
हिंजवडी वाहतूक विभाग-
वाकड ब्रिजवरुन व वाकड नाका येथून इंडीयन ऑईल चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या जड / अवजड वाहनांना प्रवेश बंद
मुंबई बेंगलोर महामार्गावरुन मायकार शोरुम येथून डावीकडे वळून हिंजवडी आयटी पार्क मध्ये प्रवेश बंद
सांगवी वाहतूक विभाग
राजीव गांधी पूल -रक्षक चौक मार्गे काळेवाडी फाटा उड्डाणपुल व काळेवाडी फाटा उड्डाणपुल रक्षक चौक मार्गे राजीव गांधी पूल प्रवेश बंदी
काळेवाडी फाटा ते तापकीर चौक मार्गे एम. एम. चौक एम्पायर ईस्टेट या दरम्यान प्रवेश बंदी
कस्पटे चौक ते सांगवी वाहतूक विभाग हद्दीतील सावित्रीबाई फुले चौक मार्गे शिवार चौक कोकणे चौक मार्गे म्हसोबा चौक नाशिक फाटाकडे प्रवेशबंदी
म्हसोबा चौक मार्गे पिंपळे गुरवकडे जाणा-या दरम्यानचे रस्त्यावर व सांगवी फाटयाकडून सांगवी गावात जाणा-या दरम्यान प्रवेश बंद
वाकड वाहतूक विभाग
वाकडनाका ते कस्पटे चौक-जड वाहनांस प्रवेश बंद.
बिर्ला हॉस्पीटल ते भुमकर चौक जड वाहनांस प्रवेश बंद.
जिंजर हॉटेल येथून सर्व्हिस रोडने भुमकर चौककडे येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद.
मायकार शोरुम येथून भुमकर चौककडे सर्व्हिसरोड येण्यासजड वाहनांस प्रवेश बंद.
शनिमंदिर येथून सर्व्हिस रोडने भुमकर चौककडे येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद.
जॅगवार शोरूम येथून भुमकरचौककडे येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद.
वाकडगाव चौकाकडून दत्तमंदिर रोड वाकडकडे येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद.
तापकीर चौक ते थेरगाव फाटा येथील थेरगाव मधील रोडला जड वाहनांस प्रवेश बंद.
वाकड वाहतूक विभाग हद्द- प्रवेश बंद .
पिंपरी चाहतूक विभाग
पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलावर व शगुन चौक-
प्रवेश बंद .
भाटनगर कॉर्नर या ठिकाणी मेन बाजार प्रवेश बंद .
शगुन चौक ते साई चौक- आर्य समाज चौक ते कराची चौक, शगुन चौक ते डिलक्स चौक
काळेवाडी पुलापर्यंत कराची चौक – आंबेडकर रोड (रिव्हर रोड ) भाटनगर पर्यंत प्रवेश बंद .
साई चौक ते गेलार्ड चौक- प्रवेश बंद .
दिघी आळंदी वाहतूक विभाग
देहुफाटा चौक ते चाकण चौक- प्रवेश बंद.
चाकण चौक ते वडगाव चौक- प्रवेश बंद.
वडगाव चौक ते मरकळ चौक- प्रवेश बंद .
मरकळ चौक ते देहुफाटा -प्रवेश बंद
देहुरोड वाहतूक विभाग:
स्वामी चौकातुन देहुरोड बाजार व सवाना चौकातून देहुरोड बाजार-
प्रवेश बंद.