नाट्यगृहांची भाडेवाढ कमी होईपर्यंत पाठपुरवठा करणार – अमित गोरखे
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाट्यगृहांच्या भाडेवाढीच्या संदर्भात लवकरच प्रशासना सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिके अंतर्गत येणाऱ्या सर्व नाट्यगृहाच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे कलाकारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही भाडेवाड कमी करावी म्हणून गोरखे यांनी प्रशासनास वेळोवेळी निवेदने दिली होती. परंतु तरी देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून नाट्यगृहांची भाडेवाढ केली आहे.पूर्वी नाट्यगृहाचे जे दर आकारले जात होते. त्या पेक्षा तिप्पट ते चार पट जास्त दर आकारले जात आहेत. या परिस्थितीत साहित्यिक व कला प्रेमी नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील या विषयी समाधान होत नव्हते. त्यामुळे गोरखे यांनी पालकमंत्री पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या विषयी निवेदन दिले.
पालकमंत्री पाटील हे संबंधित विषयांची लवकरच माहिती घेऊन अधिकाऱ्यां सोबत बैठक घेतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. जो पर्यंत नाट्यगृहांची भाडेवाढ कमी होणार नाही तो पर्यंत या विषयी पाठपुरवठा केला जाईल, अशी माहिती गोरखे यांनी दिली.