महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत
घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या http://www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
12 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. 8 वी ) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल 29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता.या निकालाच्या अनुषंगाने 29 एप्रिल 2023 ते 9 मे 2023 या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणी साठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे.
या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून बघता येणार आहे.