“भरत गोगावले यांनी माध्यमांवर बोलू नये,” संजय शिरसाट यांची गोगवलेंना विनंती
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार एकीकडे रखडलेला असताना रायगडचा पालकमंत्री मीच होणार यावर शिवसेना नेते भरत गोगावले ठाम आहेत. नुकतेच पालकमंत्री पदावरून आदिती तटकरे यांच्याबाबतीत बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीने भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका केली.
त्यामुळे भरत गोगावले यांना त्यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांनी न बोलण्याचा सल्ला दिला आहे.माध्यमांसमोर गोगावले यांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. पक्षाचे प्रतोत हे जबाबदारीचे पद त्यांच्याकडे आहे,
तसेच अशा विधानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नक्कीच व्यथित होतात. येत्या दोन दिवसात निर्णय होण्यावर आमच्या गटाला आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतरही भरत गोगावले आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी आणि आमच्यात कुठलीही धुसफुस नाहीये. सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पालकमंत्री पदासाठी त्यांची कुठलीच नाराजी नाही आणि पालकमंत्री मीच होणार, तडजोड केली जाणार नाही.”तरीही यांनतर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ज्यावेळी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करतील तेंव्हा मीडिया समोर याविषयी खुलासा होईलच.