चिंचवड:वायुगळतीच्या वृत्ताने अग्निशमन विभागाची उडाली एकच धांदल
शहरात या ठिकाणी वायुगळती झाल्याचे समजताच अग्निशमन विभाग,आपती व्यवस्थापन विभागाचे पथक त्वरित दाखल होते. त्यानंतर काहीक्षण एकच गोधळ उडतो.ही वायुगळती रोखण्यात काही वेळाने यश येते,संभाव्य धोका टळतो.पण याचे कारण समजून घेण्यासाठी चौकशी केल्या नंतर लक्षात येते की,हे वायुगळतीचे मॉक ड्रिल सुरू होते.
शहरात निगडी गॅस टैंकर अपघात वायुगळतीचे प्रकरण ताजे असतानाच चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत हा प्रकार घडल्याने एकच धांदल उडाली.
महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ऑन साइट जॉइंट मॉक ड्रिल आज झाले,आपत्कालीन परिस्थितीमध्ये कमीत कमी कालावधीत संकट कसे टाळता येईल तसेच जीवित आणि वित्तहानी होऊ नये याची दक्षता घेतली गेली पाहिजे. आपत्कालीन परिस्थिती मध्ये संकटावर कशा प्रकारे मात करता येईल, हा या मॉक ड्रिलचा उद्देश होता किती वेळामध्ये अग्निशमन दल व इतर यंत्रणा प्रतिसाद देऊ शकतात, यासाठी हे मॉक ड्रिल करणे तितकेच महत्त्वाचे होते.
*सुरक्षेसाठी घेतला उपक्रम*
निगडीत झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जाळे पाटील यांनी यासंबंधी बैठक घेतली.यावेळी औद्योगिक सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आपती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ऑनसाइट ऑइंट मॉक ड्रिल घेतले. असे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश हिल यांनी सांगितले.
अग्निशमन अधिकारी उदय वानखेडे,औद्योगिक सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक संजय गिरी, टाटा मोटर्सचे सुरक्षा अधिकारी राकेश पांडे कारखाना व्यवस्थापक प्रशांत जोशी, आपत्ती नियंत्रक शशिन पाटील टाटा मोटर्स कामगार संघटनेचे प्रतिनिधी संतोष संकपाळ, अदि सय्यद हे मदतकार्यात सहभागी झाले. टाटा मोटर्सचे कारखाना व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी सहकार्य केले.